शनिवारीही दिलासा … बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.22 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 5520 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 789 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4731 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी कमी होत आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आज सलग चौथ्या दिवशी हजाराच्या आत आकडा आला आहे.

(Consolation on Saturday too … Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात 195 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 69 व आष्टी तालुक्यात 69 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 47 तर केजमध्ये 75 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आज बीड व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आली आहेत.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-195, अंबाजोगाई-69, आष्टी-69, धारुर-47, गेवराई-103, केज-75, माजलगाव-42, परळी-57, पाटोदा-53, शिरुर-57, वडवणी-22 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) दररोज हजारावर येणारी संख्या मागिल काही दिवसात कमी होत आहे. शहरी भागातला संसर्ग कमी होवून सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. देशासह राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून दिलासादायक आकडेवारी आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 2 लाख 57 हजार 299 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आज दिवसभरात 44 हजार 493 रूग्ण करोनातून बरे झाले असून, 555 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 29 हजार 644 नवीन करोनाबाधित वाढले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 50,70,801 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 91.74 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 86 हजार 618 रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!