बीड जिल्ह्यात कोरोना पुन्हा 1118; धारुर 80 तर केज 105… पहा तालुकानिहाय संख्या.

बीड दि.17 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4403 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1118 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3285 जण निगेटिव्ह आली आहेत. काल अनेक दिवसांनंतर जिल्ह्याची आकडेवारी हजाराच्या आत आल्याने दिलासा मिळला होता. मात्र आज पुन्हा संख्या वाढल्याने चिंता वाढली.
(Corona again 1118 in Beed district; Dharur 80 and Kaij 105 … see taluka wise numbers.)
आज बीड तालुक्यात 330 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 67, आष्टी तालुक्यात 96 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 80 तर केजमध्ये 105 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-330, अंबाजोगाई-67, आष्टी-96, धारुर-80, गेवराई-86, केज-105, माजलगाव-96, परळी-35, पाटोदा-125, शिरुर-66, वडवणी-32 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजार ते बाराशेवर स्थिरावलेली दिसत आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. काल बीड जिल्ह्यात महिनाभरानंतर हजाराच्या आत रुग्ण संख्या आल्याने काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आता पहिल्यांदाच दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पहिल्यांदा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एका आठवड्यापूर्वी जेथे 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते, तेथे आता मागच्या 24 तासांत 34,389 नव्या रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर याच काळात 59,318 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
राज्यात मागच्या 24 तासांत 974 मृत्यू झाले आहेत. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या वाढून 84,486 वर गेली आहे. राज्यात आज नव्या रुग्णांची भर पडून सक्रिय रुग्णसंख्या 4,68,109 झाली आहे.