धारुर, पाटोदा तालुक्यात कोरोना विस्फोट; बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.4 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 3870 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 159 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3711 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात अनुक्रमे 103, 111, 120 अशी तर आज अचानक 159 ऐवढी संख्या आली होती. धारुर तालुक्यातील 3 ते 7 मध्ये असणारी संख्या आज आरणवाडी गावात (14 बाधित) अचानक कोरोना विस्फोट होवून संख्या 21 झाली आहे. तर एकट्या पाटोदा तालुक्यात 41 (ज्यात कुसळम 17) रुग्ण आढळले आहेत.
(Corona blast in Dharur, Patoda taluka; Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-28, अंबाजोगाई-2, आष्टी-24, धारुर-21, गेवराई-14, केज-7, माजलगाव-4, परळी-2, पाटोदा-41, शिरुर-8, वडवणी-8 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शंभर तर दोनशेमध्ये स्थिरावली आहे. राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत कमालीची घट झालेली असून महाराष्ट्रात सातारा जिल्हा मात्र अजूनही रेड झोनमध्ये आहे.
दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. राज्यात शनिवारी 153 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.