
किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) ज्युनिअर आय.ए.एस. स्पर्धा परीक्षेमध्ये तालुक्यातून ज्ञानदीप विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
बाल वयापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे धारूर शहरातील एकमेव विद्यालय म्हणून ओळख आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये संस्कार प्रकाशन लातूर आयोजित ज्युनिअर आय.ए.एस. या स्पर्धा परीक्षेची आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले होते. या मध्ये किल्ले धारूर तालुक्यातून ज्ञानदीप विद्यालयाच्या तब्बल ९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षांमध्ये विविध वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये
इयत्ता तिसरी
प्रथम : चि. वेदांत विश्वास शिनगारे
द्वितीय : चि. शौर्याने विनायक शिनगारे
तृतीय : चि. सुमित रणजित साळवे
इयत्ता चौथी
प्रथम : चि. वेदान्त हरीराम नाईकवाडे
द्वितीय : चि. सार्थक विनायक शिनगारे
तृतीय : चि. प्रणव प्रमोद शिनगारे
इयत्ता सहावी
प्रथम : चि. वेदान्त बाबासाहेब मुंडे
द्वितीय : चि. सत्यम सुरेश शिनगारे
तृतीय : चि. शिवम दत्तात्रय शिनगारे
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकवर्ग यांच्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.