आरोग्य

dengue fever… धारुरमध्ये पुन्हा 14 वर्षीय मुलाचा तापीने मृत्यू.

60 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.19 अॉक्टोंबर – dengue fever धारुर येथील जाधव गल्लीतील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय मुलाचा लातूर येथे तापीची लागण होवून उपचार सुरु असताना निधन झाले. या घटनेमुळे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. ( dengue fever… 14-year-old boy of Dharur dies of fever.)

धारुर Dharur तालुक्यातील आरणवाडी येथील मुळ रहिवासी असलेले बजरंग माने हे शहरातील कसबा विभागात जाधव गल्लीत सध्या निवासी आहेत. बजरंग माने यांच्या ओंकार उर्फ दादू (वय 14) या मुलास गेल्या काही दिवसांपासून तापीची लागण झाली. खाजगी दवाखान्यात उपचारानंतर त्या मुलास येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती ढासळत असल्याने त्यास लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मुलास डेंग्यू dengue fever झाल्याची चर्चा आहे. दि.18 अॉक्टोंबर 2023 बुधवार रोजी उपचार सुरु असताना रात्री त्याचे निधन झाले. ओंकार हा येथील जनता माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनामुळे धारुर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!