बीड जिल्ह्यात कोरोना मृत्यू सत्र सुरुच; गुरुवारी 32 तर आज 49 नवीन बाधित.

बीड दि.24 सप्टेंबर – बीड जिल्हयात कोरोना बाधितांचे आकडेवारी काहीशी कमी होत असताना कोरोना बळींचे प्रमाण मात्र अद्याप आटोक्यात आलेले नाही. गेल्या 48 तासात 6 कोरोना बळी गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे. काल दि.23 रोजी जिल्ह्यात 32 तर आज 49 (दि.24) नवीन बाधित आढळून आली आहेत.
(Corona death season continues in Beed district; On Thursday, 36 corona-free and 32 newly infected.)
मंगळवारी (दि.21) रोजी जिल्ह्यात एकुण 2748 मृत्यूची नोंद होती. बुधवारी (दि.22) रोजी 24 तासात यात वाढ होवून 2752 झाली. यात 3 नवीन तर 1 जुन्या मृत्यूची नोंद होती. हिच संख्या आज दि.23 रोजी जिल्ह्यातील एकुण मृत्यूची नोंद 2754 आहे. गेल्या 24 तासात दोन कोरोना मृत्यू (corona death) नोंदवण्यात आली आहेत.
बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज शुक्रवारी 2162 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 49 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Corona positive) आला आहे. तर 2113 जण निगेटिव्ह आली आहेत. सलग पाचव्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-7, आष्टी-6, धारुर-1, गेवराई-5, केज-5, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-8, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे. दरम्यान काल दि.23 गुरुवारी 36 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्याची ॲक्टीव रुग्ण (Active patients) संख्या 470 आहे.