कोरोंना विशेष

रविवारी राज्यात कोरोनाचा भडका; सहा महिन्यातील सर्वाधिक संख्या

मुंबई दि.14 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) आज 8,861 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 21,34,072 करोना बाधित रुग्ण (Corona Positive) बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.21% एवढे झाले आहे. आज राज्यात 16,620 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 50 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.28% एवढा आहे. आजची कोरोना बाधितांची संख्या मागिल सहा महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.

(Corona eruption in the state on Sunday; The highest number in six months)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,75,16,885 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,14,413 (13.21 टक्के) नमुने पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. सध्या राज्यात 5,83,713 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,493 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,26,23 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra) मागिल चार दिवसातील कोरोना बाधित व मृतांची संख्या धक्कादायक आहे. चार दिवसात तब्बल 45 हजार 735 नवीन बाधितांची भर पडली आहे. तर 251 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चालू आठवड्यात ॲक्टीव रुग्णांची (Active patients) संख्या झपाट्याने वाढली आहे.

गुरुवारी 14 हजार 316 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 57 कोरोना बाधितांचा (Corona Positive) मृत्यू झाला.
शुक्रवारी 15 हजार 817 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

शनिवारी 15 हजार 602 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर 88 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज रविवारी राज्यात 16,620 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 50 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!