बीड

Leopard… धारुर वनपरिक्षेत्रात मृत अवस्थेत आढळला बिबट्या.

58 / 100

किल्लेधारुर दि.22 जुलै – Leopard धारुर वनपरिक्षेत्रात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे अंदाजे तीन ते चार वयोगटातील बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( Leopard … Leopard found dead in Dharur forest area.)

वडवणी तालुक्यात डोगंरपट्यात ऊर्ध्व अप्पर कुंडलिका प्रकल्पालामुळे नंदनवन झाले असल्याने ऊसाचे क्षेञ वाढले असून यामुळे वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढला आहे. चिखलबीड येथील शेतकरी आशोक बाबुराव तांदळे यांच्या ऊसाच्या शेतात सकाळी 10 वाजता बिबट्या Leopard मृत अवस्थेत आढळून आला असून घटनेची माहिती वन विभागाला forest area देण्यात आल्यानंतर विभागीय वन अधिकारी के. एम. गित्ते , वनपरिक्षेत्र अधिकारी यु. एच. चिकटे, स.पो.नि अमन सिरसट, पोलीस नाईक विलास खरात , वनपरिक्षेत्र अधिकारी बीड आशोक काकडे हे घटनास्थळावर पोहचले. घटनास्थळावर पाहणी करून रीतसर पंचनामा करण्याची प्रक्रिया पुर्ण केली.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळावर पोहचले नसल्याने 6;30 वाजता घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यात आले व नंतर धारूर Dharur येथील वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यासाठी केज, अंबाजोगाई, वडवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांची त्रिसदसीय समिती दाखल झाली होती . शवविच्छेद अहवाला नंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल असे विभागीय वन अधिकारी के. एम. गित्ते यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!