खळबळजनक… बीड जिल्ह्यात बसवर दगडफेक; कारण अस्पष्ट…

बीड दि.24 एप्रिल – बीड जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये (Gevrai) एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तसंच एका खासगी बसलाही टार्गेट करण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्रात राजकीय आखाडा गरमागरम झालेला दिसत असताना बीड (Beed) जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली. गेवराई येथे अज्ञात टोळक्यांनी दोन एसटी बसवर दगड भिरकावले. यात एसटी बसचे (ST Bus) नुकसान झाले. तसेच या दगडफेकीत एका खासगी बसचेही नुकसान झाले. नेमकी ही दगडफेक कोणत्या कारणासाठी करण्यात आली याची माहिती अस्पष्ट आहे. पोलिस तपासानंतर ते स्पष्ट होईल.
दोन्ही बसवर दगडफेक (Stone attack) करण्याआधी अज्ञातांनी रस्त्यावर टायर जाळण्यात आले होते. त्यानंतर एकूण तीन बसवर दगडफेक करण्यात आली आहे. रातोरात घडलेल्या या घटनेनं अचानक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आठ ते नऊ जणांनी एकत्र येऊन ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या लोकांनी दगडफेक केली. यावेळी प्रतिकात्मक अज्ञात पुतळा जाळत ट्रॅव्हल्सवर दगडफेक केल्याचं सांगितलंय जातं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बीडचे पोलीस उपअधिक्षकांना ही माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली. सध्या याप्रकरणी पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत. दरोडा घालण्याच्या उद्देशानं ही दगडफेक करण्यात आली होती की आणखी काही कारणं होतं? हे आता चौकशीअंती समोर येईल.
( Sensational … stone pelting on bus in Beed district; Reason unclear … )