बीड जिल्ह्यात कोरोना कहर सुरुच; प्रत्येक तालुका झाला बाधित.

बीड दि.18 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4725 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1145 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3580 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्हाभर कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.(Corona havoc continues in Beed district; Every taluka was affected.)
आज बेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात तब्बल 276 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 219, आष्टी तालुक्यात 149 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 38 तर केजमध्ये 131 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-276, अंबाजोगाई-219, आष्टी-149, धारुर-38, गेवराई-89, केज-131, माजलगाव-91, परळी-59, पाटोदा-47, शिरुर-31, वडवणी-15 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. सध्या लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते, मटन चिकनषव बेकरीच्या दुकांनाना सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या फैलावाचा वेग कायम आहे. राज्यात शनिवारी कोरोनाच्या 67 हजार 123 नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर दिवसभरात 419 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 37 लाख 70 हजार 707 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 59 हजार 970 जणांचा मृत्यू झाला आहे. कालची संख्या आजपर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.