बीड जिल्ह्यात कोरोना कहर सुरुच; केज, माजलगाव, परळी व आष्टीत संख्या वाढली.

बीड दि.30 मार्च- गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2036 प्राप्त अहवाला पैकी 318 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1718 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पंचेविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज 88 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. धारुर 7 तर केजमध्ये 25 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(Corona havoc continues in Beed district; The number increased in Cage, Majalgaon, Parli and Ashti.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-88, अंबाजोगाई-59, आष्टी-42, धारुर-7, गेवराई-9, केज-25, माजलगाव-31, परळी-38, पाटोदा-18, शिरुर-0, वडवणी-1
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.30 मंगळवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 386 वरुन 318 झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज पाचवा दिवस आहे. जिल्ह्यात आज पासून लॉकडाऊन मध्ये बदल झाला असून इतर व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. तब्बल 31 हजार पेक्षा जास्त नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा कठोर निर्णय घेण्याचे वक्तव्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!