घात-अपघात

इनोव्हा कार – ॲपे रिक्षाचा भीषण अपघात; केजचे चार ठार, चार गंभीर जखमी.

केज दि.2 जून – होळ ता. अंबाजोगाई जवळ गुरुवारी सायंकाळी 5 वाजता इनोव्हा आणि ॲपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना यात चौघे जागीच ठार झाल्याची तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच 16 सीएन 700) होळ येथे ॲपे रिक्षाला ( एमएच 23 एक्स 5229) जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी संपती मुंडे (वय 28, रा. पिसेगाव, ता. केज), मच्छिन्द्रसिंग चरणसिंग गोके (वय 35) यांच्या सह तीन महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा मृतात समावेश आहे.

गंभीर जखमी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालक वगळता इतर मृत आणि जखमी शिकलकरी समाजाचे असून एकाच कुटुंबातील आहेत. सर्व मृत केजचे रहिवासी आहेत. तर जखमीत जालना येथील व्यक्तींचा समावेश असल्याचे कळते.

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्ग 548 डी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु आहे. बर्दापुरनजीक नुकताच क्रुझर व ट्रकचा अपघात होवून आठ जण तर त्यापुर्वी बसचा अपघात होवून चार जण दगावल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी वर देखील मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरुच आहे. काल दि.1 जुन बुधवारी रात्री 9 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी या रस्त्यावर धारुरच्या तरुण पत्रकाराला एका वाहनाने उडवल्याची घटना घडली. यानंतर आज केज तालुक्यातील एकाच कुटूंबावर काळाने घाला घातला.

( Innova car – Ape rickshaw crash; Kaij’s four killed, four seriously injured. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!