बीडमध्येही कोरोना कहर… बीड पाठोपाठ अंबाजोगाईची चिंता वाढली; पहा काय आहे आजची परिस्थिती

बीड दि.11 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील संख्या द्विशतकाकडे वाटचाल करत असल्याचे दिसुन आले. 1407 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 185 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1222 जण निगेटिव्ह आली आहेत. आज नवव्या दिवशी सर्वाधिक 85 कोरोना पॉझिटीव्ह एकट्या बीड तालुक्यात आढळली आहेत. बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 42 रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Corona havoc in Beed too … Beed followed by Ambajogai’s anxiety increased; See what the situation is today)
1. बीड- 85 7.माजलगाव-13
2. अंबाजोगाई-42 8.परळी-5
3. आष्टी- 16 9.पाटोदा-0
4. धारुर-1 10.शिरुर-1
5. गेवराई-12 11.वडवणी-3
6. केज-7
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.11 गुरुवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढली आहे.
दरम्यान, राज्यात आज कोरोनाने पुन्हा 13 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली आहे. 31 मार्चपर्यंत सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश काढले असले तरी वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जात असताना मुख्यमंत्र्यांनी कालच पुन्हा कठोर निर्णय घेण्याची वेळ येवू देवू नका असा इशारा दिला आहे.