बीड, अंबाजोगाईचा कोरोना कहर सुरुच; आष्टी 112, धारुर 41 तर केज 69.

बीड दि.14 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 3554 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 928 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2626 जण निगेटिव्ह आली आहेत.

आज अडतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 246 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज पुन्हा सर्वाधिक अंबाजोगाईत 252 व आष्टी तालुक्यात 112 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 41 केजमध्ये 69 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
(Beed, Corona havoc of Ambajogai; Ashti 112, Dharur 41 and Kaij 69.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-246, अंबाजोगाई-252, आष्टी-112, धारुर-41, गेवराई-55, केज-119, माजलगाव-51, परळी-40, पाटोदा-20, शिरुर-24, वडवणी-18
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.14 बुधवारी आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात आता कोविड सेंटर फुल होत असुन इतर समस्या पुढे येत आहेत. आज रात्री 8 पासून राज्यात कलम 144 लागू करत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस यामुळे सर्वांना घरातच रहावं लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मंगळवारी दिवसभरात ६० हजार २१२ नवे रुग्ण आढळून आले. तर २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५ लाख ९३ हजार ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!