माजलगावात माय लेकींचा होरपळून दुर्दैवी मृत्यू ; शॉटसर्किटमूळे घडली घटना

माजलगाव दि.23 मे- माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथे शॉर्टसर्किटने (Short circuit) लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.23) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.
(Tragic death of mother and daughter in Majalgaon; Incident caused by a short circuit)
शशिकला शंकरराव फफाळ (वय 65) व त्यांची मुलगी सखुबाई शंकरराव फफाळ (वय 45) अशी मयतांची नावे आहेत. त्या घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अचानक शॉर्टसर्किटने (Short circuit) घरात आग लागली. या आगीत दोघींचाही होरपळून जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव (Majalgoan) ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे, उपनिरीक्षक निलेश इधाटे, कर्मचारी राठोड यांनी धाव घेतली. पंचनामा सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे किट्टीआडगाव या गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.