कोरोंना विशेष

Corona new variant… कोरोनाच्या नव्या विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव ; देशभरात 656 कोरोनाबाधित.

56 / 100

मुंबई दि.25 डिसेंबर – Corona new variant महाराष्ट्रात कोरोनाच्या जेएन 1 या नव्या विषाणूने शिरकाव केला असून ठाण्यात रविवारी जेएन.1 विषाणूचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिलेसह 4 पुरुषांचा समावेश आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.1 विषाणूचे Corona new variant तब्बल 9 रुग्ण आढळून आले आहेत. नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत 05, पुणे महापालिका हद्दीत 02, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी आठ रुग्णांनी कोविडच्या Covid 19 लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सध्या या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्यांमध्ये जेएन 1 व्हेरिएंटचे Corona new variant तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

भारतात 24 तासात 656 कोरोनाबाधित…
भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. देशात कोरोनाच्या नवीन जेएन.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात हा व्हेरिएंट कोकणात दाखल झाला. आता कोकणानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचे रुग्ण मिळाले आहे. गेल्या 24 तासात भारतात Covid 19 कोव्हिड 19 चे 656 रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!