हवामान

unseasonal rain अवकाळी पावसाचा कहर सुरुच ; केजमध्ये वीज पडून शेतकरी ठार.

63 / 100

केज दि.28 एप्रिल – unseasonal rain अवकाळीचा कहर आजही सुरुच असून केज तालुक्यात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना केज तालुक्यातील कोळगाव येथे घडली.

( The havoc of unseasonal rain continues; Farmer killed by lightning in Kaij. )

आज दि.28 एप्रिल शुक्रवार रोजीही अवकाळीचा कहर दिसून आला. बीड जिल्ह्यासह अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका बसला. शेती नुकसानीसह अनेक भागात वीजेचा गडगडाटात वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यात मागिल आठवड्यात वीज पडून दोन महिला, पाच जनावर व एक शेतकरी दगावला आहे. मागील काही दिवसांपासून केज तालुक्यातही अवकाळीचा कहर havoc of unseasonal rain दिसून येत आहे. यापूर्वीही गारपीट व वीज कोसळून शेतीची आणि जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज शुक्रवारी ( दि. 28) सकाळ पासूनच केज तालुक्यातील काही भागात ढग दाटून आले. शेजारच्या धारुर तालुक्यात रात्री अनेक भागात पाऊस झाला. आज मस्साजोग ता. केज भागात जोरदार गारपीट झाली. कोळगाव ( ता. केज ) येथे वीज कोसळल्याने शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मराठवाड्याला अॉरेंज अलर्ट
पुणे हवामान खात्याने ( Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे. यासह पुणे जिल्ह्याला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने ( Meteorological Department ) वर्तवली आहे. तसेच, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील दोन दिवस देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!