कोरोंना विशेष

कोरोना वेग मंदावला मात्र मृत्यू सुरुच… धारुरचा आणखी एक बळी.

किल्लेधारूर दि.१ नोव्हेंबर (वार्ताहर)- तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना बळींची शृंखला सुरुच आहे. मृत्यू दर पाहता ही चिंतेची बाब मानली जात आहे. शहरातील ७४ वर्षीय वृध्दाचे अंबाजोगाई येथे कोरोना वर उपचार सुरु असताना दि.३० गुरुवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर काल दि.३१ रोजी अंत्यसंस्कार झाले. कोरोना (Corona) बळीत धारुरचा हा २६ वा बळी (Death) आहे.

दिवसेंदिवस तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. सध्या येथील कोविड केअर सेंटरमध्ये फक्त २२ जन उपचार घेत आहेत. पॉझिटीव्ह संख्या कमी येत असताना मृत्यू दर मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारुर शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३.५ टक्के आहे. शहर व तालुक्यातून कोरोनामुळे मरणाऱ्यामध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक आहे. शहरातील एक ७४ वर्षीय वृध्द दि.२३ आक्टोंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात सलग ६ दिवस २३ तास उपचार करण्यात आले. मात्र दि.३० रोजी रात्री ११.३० वाजता त्यांचे निधन झाले. तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणाऱ्यांची संख्या आता २६ झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत ७२१ जनांना कोविड-१९ (Covid-19) ची लागण झाल्याची नोंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!