बीड जिल्ह्यात आज कोरोनाची धुरवड; बाधितांचा आकडा चारशेजवळ.

बीड दि.29 मार्च- गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. काल जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र यात पुन्हा वाढ झाली. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2209 प्राप्त अहवाला पैकी 386 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1823 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चोविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आजवरची सर्वाधिक 172 कोरोना पॉझिटीव्ह संख्या आहे. धारुर व केजमध्ये प्रत्येकी 9 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.
(Corona smoke today in Beed district; The number of victims is close to four hundred..)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-172, अंबाजोगाई-75, आष्टी-41, धारुर-9, गेवराई-13, केज-9, माजलगाव-14, परळी-29, पाटोदा-11, शिरुर-6, वडवणी-7
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.29 सोमवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 284 वरुन 386 झाली आहे. कालपेक्षा जवळपास 102 ने संख्या वाढली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज चौथा दिवस आहे.
दरम्यान, रविवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. तब्बल 40 हजार 414 नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आली. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.