शुक्रवारी राज्यात ८,३३३ रुग्णांची नोंद…१८ राज्यांना धोका… केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये

मुंबई : दि.२७- शुक्रवारी राज्यात ८,३३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह १८ राज्यात नव्या कोरोनाचा धोका वाढला असून केंद्र सरकारनेही सध्या लागू असलेल्या कोरोना गाईडलाईन्सची (corona guidelines) मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. यासोबतच नव्या स्ट्रेनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देखरेखीची विशेष मोहीम सुरू केली आहे.
(8,333 patients registered in the state on Friday … Threat to 18 states … Central government in alert mode)
महाराष्ट्रात (Maharashtra) शुक्रवारी ४,९३६ रुग्ण बरे होऊन सुट्टी देण्यात आली आहे, राज्यात आजपर्यंत एकूण २०,१७,३०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३५% एवढे झाले आहे. शुक्रवारी राज्यात ८,३३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तरा ४८ करोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,१२,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,३८,१५४ (१३.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. सध्या राज्यात ३,१८,७०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (corona spread in India) प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर (central government on alert mode) आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने सध्या लागू असलेल्या कोरोना गाईडलाईन्सची (corona guidelines) मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. याशिवाय कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारनं २७ जानेवारी २०२१ ला कोरोनाविषयक नव्या गाईडलाईन्स लागू केल्या होत्या. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाईडलाईन्सचं यापुढेही ३१ मार्चपर्यंत पालन करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये खबरदारी घेण्याच्या आणि कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
महाराष्ट्रासह १८ राज्यांत नवा स्ट्रेन
कोरोनाची चिंता सध्यातरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशात महाराष्ट्र, केरळ, तेलंगणासह १८ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा (New corona strain) फैलाव वाढला आहे. या राज्यांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमधून आलेल्या स्ट्रेनचे आतापर्यंत जवळपास २०० रुग्ण सापडले आहेत. नव्या स्ट्रेनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देखरेखीची विशेष मोहीम सुरू केली आहे.
नवीन स्ट्रेनचा (New corona strain) फैलाव चिंता वाढवू लागल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर विशेष देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. 18 राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, पंजाब यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.