बीड जिल्ह्यात ‘या’ प्रमाणपत्रांसाठी कोरोना लसीकरण बंधनकारक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

बीड दि.30 अॉक्टोंबर – कोविड-19 (Covid-19) लसीकरणा संदर्भात बीड जिल्ह्यात कठोर पावले उचलण्यात आली आहेत. तहसील कार्यालया अंतर्गत दिली जाणारी विविध प्रमाणपत्रे ही आता कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccine) केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडल्या शिवाय देऊ नयेत असे सक्त आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Radhavinod Sharma) यांनी सर्व तहसील कार्यालयांना दिले आहेत.
(Corona vaccination mandatory for ‘These’ certificates in Beed district; Collector’s order.)
बीड (Beed) जिल्ह्यात सध्या 52 टक्के नागरीकांनी कोव्हिड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. या लसीकरण (vacccination) मोहिमेला गती देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड जिल्हा परिषदेच्या एका पत्राद्वारे दि.27 ऑक्टोबर रोजी (जा. क्र. जिपबी /आखा /वै.शा. /2437/2021) आदेश काढले आहेत.
या आदेशात बीड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया अंतर्गत दिली जाणारी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर विविध प्रमाणपत्रासाठी नागरीक तहसील कार्यालयामध्ये येत असतात. तसेच विविध कार्यालया मध्ये वेगवेगळ्या कामकाजासाठी नागरीक अर्ज करत असतात. अर्ज सादर करतांना अर्जदार यांचे लसीकरण झाल्या बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य (mandatory) करण्यात आले आहे.
तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुखांना विविध कामकाजासाठी येणाऱ्या अर्जदाराच्या अर्जा सोबत लसीकरण झाल्या बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य करावे असा आदेश निर्गमित केला आहे. या मुळे आता लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत असेल तरच अर्ज स्विकारला जाईल किंवा विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत.