मुलगा झाला, आनंदात पेढे वाटले; ११६ जन कोरोंटाईन

नांदेडः मुलगा झाला म्हणून एका तरुणाने गावात मित्रमंडळीस पेढे वाटून आनंद साजरा केले. मात्र सदर तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यावर पेढे खाणाऱ्या ११६ लोकांना कोरोंटाईन होण्याची वेळ आल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा ता.कंधार येथे घडली.
औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत कामावर असणाऱ्या एका युवकास मुलगा झाला. मुलाला पाहण्यासाठी सदरील तरुण आपल्या नातलगांना भेटून दि.४ जूलै रोजी काटकळंबा येथे गेला. आनंदाने सदरील तरुणाने नातलगांसह आपल्या मित्रमंडळीला पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर सदरील तरुण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बारुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या कॉन्टॕक्ट ट्रेसिंग मध्ये तरुणाचा अनेकांशी संपर्क आल्याचे दिसुन आले. पेढे खाणाऱ्या ११६ जनांना आरोग्य विभागाने कोरोंटाईन केले आहे. तर जवळचा संपर्क आलेल्या ९ जनांना कंधार येथे स्वॅब घेण्यासाठी पाठवले. या नऊ जनांत बाधित तरुणाच्या कुटूंबियांसह मामा, मामी व सलूनवाल्याचा समावेश आहे.