धारुरच्या एसबीआय मध्ये कोरोनाची इंट्री; संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस रस्त्यावर.

किल्लेधारूर दि.15 एप्रिल – आज संचारबंदीचा (Curfew) पहिला दिवस असून संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिस दादा रस्त्यावर उतरुनही अनेक जण बिनकामाचे रस्त्यावर भटकत असल्याचे दिसत आहेत. तर येथील मेन रोडवरील स्टेट बँक अॉफ इंडिया (हैद्राबाद) (State Bank of India) शाखेतील तीन कर्मचारी कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

(Corona’s entry in Dharur’s SBI; Police on the streets to enforce the curfew.)

राज्यात रात्री पासून सुरु झालेली संचारबंदी अत्यावश्यक सेवा सुरु असल्याने मोडित निघत आहे. मोठ्या प्रमाणात नागरीक रस्त्यावर येत असल्याने गर्दी होत आहे. चक्क संचारबंदीत विविध कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. येथील पोलिस (Police) प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांना झोडपले असून व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद पाळून प्रशासनाला सहकार्य दाखवले आहे. मात्र सडक सख्याहरी घरात बसत नसल्यामुळे पोलिस प्रशासनाला कडक कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे.

येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी शहरात गस्त करुन संचारबंदीच्या (Curfew) अंमलबजावणीचे आवाहन केले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस (Police) बंदोबस्त लावण्यात आला असून वेळप्रसंगी वरिष्ठांच्या आदेशानुसार फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. चार दिवसात ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. येथील मेन रोडवरील स्टेट बँक अॉफ इंडिया (हैद्राबाद) (State Bank of India) या शाखेतही कोरोनाची इंट्री झाली आहे. सध्या भयंकर लाट असताना बँकेचे कारभार सुरु आहेत. दिवसभरात शेकडो ग्राहकांच्या संपर्कात येत असल्याने बँकेतील कर्मचारी बाधित येण्याची शक्यता अधिक आहे.

या बँकेच्या शाखेतील कर्मचारी बाधित आढळल्यामुळे बँकेचे कामकाज निर्जंतूकीकरण करण्यासाठी बंद करण्यात येत असून येथील सात कर्मचारी व चार रोजंदारी कर्मचाऱ्यांची कोविड-19 तपासणी करण्यात येत असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक विनोद कुमार यांनी दिली. सकाळपासून पाच कर्मचाऱ्यांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली. यात दोन जण कोरोना बाधित आढळून आली आहेत. एका कर्मचाऱ्यांची आरटीपिसीआर अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. दुपारपर्यंत ॲन्टीजनमध्ये दोघे पॉझिटीव्ह आलेली आहेत. अशा तीन कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!