
किल्लेधारुर दि.8 आक्टोंबर – Corporator Reservation नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यानंतर आज दि.8 बुधवार रोजी शहरातील नगर परिषदेच्या 20 सदस्यांचे आरक्षण सोडत पध्दतीने काढण्यात आले. पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृहात पिठासिन अधिकारी म्हणून भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी सतिश धुमाळ व सहाय्यक पिठासिन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अजित ढोपे यांची उपस्थिती होती. यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 (आशोकनगर/आझादनगर)
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 2 (लक्ष्मीनगर/प्रतिभानगर)
अ) अनुसूचित जाती महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 3 (उदयनगर/कादरीबाग)
अ) अनुसूचित जातीमहिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 4 (गायकवाड गल्ली)
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 5 (कटघरपुरा)
अ) ओबीसी सर्वसाधारण
ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 6 (दुधियापुरा)
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 7 (नगरेश्वर/वडगावकर गल्ली)
अ) ओबीसी सर्वसाधारण
ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 (मठ गल्ली/जाधव गल्ली)
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 9 (शिनगारे गल्ली/अहिल्यानगर)
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण खुलाप्रवर्ग
प्रभाग क्रमांक 10 (साठेनगर/फुलेनगर)
अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब) सर्वसाधारण महिला



