महाराष्ट्रात नकली नोटांचे रॕकेट; पोलिसांकडून एक कारखाना उध्वस्त

महाराष्ट्रात नकली नोटांचे रॕकेट; पोलिसांकडून एक कारखाना उध्वस्त

धूळे :  बुधवारी धुळ्यात सुमारे 48 हजारांच्या नकली नोटा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केल्या. शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील नकली नोटा छपाईचा कारखाना पोलिसांनी police उद्ध्वस्त केला. घटनास्थळी बनावट नोटा छपाईसाठी लागणारे कागद, शाई, संगणक, प्रिंटर असा एकूण 48 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी police अटक केली असून दोघे फरार आहेत.

नोटा बनवण्याचं रॅकेट racket

शिरपूर तालूक्यात कार्यरत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अचानक छापा टाकून पोलिसांची कारवाई सुरू केली असतांना येथील आरोपींनी दोनशे रुपये किमतीच्या नकली नोटा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जळालेल्या नोटांचे अवशेष जप्त केले आहेत. कारखान्यात यावेळी दोनशे रुपयाच्या नोटांची छपाई करण्यात येत होती. कारखान्यावर छापा टाकला असता आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला या रॕकेट racket बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या नकली नोटांची पालेमुळे कुठवर आहेत याचा तपास पोलिस police करत आहेत. महाराष्ट्रात होत असलेल्या नकली नोटांच्या चलनामुळे सर्वसामान्य नागरीकांत नोटाबाबत साशंकता निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!