माझं गाव

धारूर तालूक्यात उद्या चार केंद्रावर होणार कोव्हॕक्सिन लसीकरण…

किल्लेधारूर दि.5 मे – धारूर शहरात नगरेश्वर मंदीर मंगल कार्यालयात गुरूवारी 6 मे रोजी एका केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागात तीन ठिकाणी आरोग्य प्रशासनाकडून कोव्हॕक्सिन (Covaxin) लसीचं लसीकरण (Vaccination) होणार आहे. विशेषतः अॉनलाईन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील लोकांना ही लस देण्यात सुरुवात होत आहे.

(Covacin vaccination will be done at four centers in Dharur taluka tomorrow …)

दि.6 मे रोजी धारूर शहरात नगरेश्वर मंदीर मंगल कार्यालय या लसीकरण (Vaccination) केंद्रावर 45 वर्षावरिल नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. धारूर तालुक्यातील भोगलवाडी, मोहखेड, रुईधारूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही कोव्हॕक्सिन (Covaxin) लसीचा डोस दिला जाणार आहे. यासर्व केंद्रावर सकाळी 10 ते 5 यावेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी पत्राद्वारे सर्व आरोग्य प्रशासनाला सुचना केल्या आहेत. जिल्ह्यात धारुर, माजलगाव, पाटोदा, वडवणी व शिरुर याठिकाणी कोव्हॕक्सिन (Covaxin) लस देण्यात येणार असल्याचे नमुद केले. धारुर (Dharur) तालुक्यात येथील ग्रामीण रुग्णालयात 800 तर इतर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात प्रत्येकी 600 असे 2600 डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध झाल्यामुळे लोकांना परत जाण्याची वेळ येणार नाही.

लसीकरणाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, इत्यादी कोवीडच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, दरम्यान कोविशिल्ड (Covishield) लस उपलब्ध नसल्यामुळे ज्या लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा (Covishield) पहिला डोस झालेला असुन दुसरा डोस बाकी आहे त्यांनी लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येऊ नये असे तहसीलदार वंदना शिडोळकर, ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ चेतन आदमाने, तालूका वैद्यकीय अधिकारी डाॕ स्वाती डिसले यांनी अवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!