बीड जिल्ह्याची कोविड स्थिती चिंताजनक… पहा आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.15 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात शंभराच्या जवळ आलेली असताना मागच्या चार दिवसात कोरोना बाधितांची संख्या दिडशेच्या पुढे आहे. आज गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे 4398 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 143 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4255 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या चार दिवसात 859 तर आज 143 असे 1002 नवीन बाधितांची भर पडल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.

(Covid condition of Beed district is worrisome … see today’s Corona update.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-23, अंबाजोगाई-3, आष्टी-37, धारुर-9, गेवराई-14, केज-9, माजलगाव-4, परळी-4, पाटोदा-31, शिरुर-4, वडवणी-5 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्या गेल्या काही दिवसांपासून दिडशेच्या पुढे गेली आहे. रविवारी 157, सोमवारी 174, मंगळवारी 175 तर बुधवारी कोरोना बाधित रुग्ण संख्या 196 येवढी होती. मागच्या पाच दिवसात संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, राज्यात काल 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 067 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 44 हजार 801 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के झाले आहे.

राज्यात काल 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 309 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!