बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.16 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात शंभराच्या जवळ आलेली असताना मागच्या चार दिवसात कोरोना बाधितांची संख्या दिडशेच्या पुढे आहे. आज गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे 4187 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 181 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4006 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या चार दिवसात 1002 नंतर आज पुन्हा 181 नवीन बाधितांची भर पडली आहे.
(Covid condition of Beed district is worrisome … see today’s Corona update.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-4, आष्टी-49, धारुर-6, गेवराई-17, केज-10, माजलगाव-10, परळी-2, पाटोदा-32, शिरुर-17, वडवणी-10 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्या गेल्या काही दिवसांपासून दिडशेच्या पुढे गेली आहे. रविवारी 157, सोमवारी 174, मंगळवारी 175, बुधवारी 196 तर आज 181 कोरोना बाधित रुग्ण संख्या आहे. मागच्या पाच दिवसात संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंतेत भर पढली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी ८ हजार ६०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा जवळपास सहाशेने कमी झाला असून ८ हजार ०१० नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०७ हजार २०५ इतकी झाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४८,२४,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८९,२५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८१,२६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी बुधवारप्रमाणेच गुरुवारी १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.