ऐन निवडणूकीच्या तोंडावर एमआयएमला खिंडार; जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीत.

लातूर दि.14 अॉक्टोंबर – लातूर (Latur) जिल्ह्यातली मोठी नगरपालिका असलेल्या उदगीर पालिकेतील एमआयएमचे (AIMIM) पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. या प्रवेशाने उदगीर नगरपालिकेचं (Municipality) राजकारण ढवळून निघालं आहे.

(Cracks in MIM in the face of AI elections; Five NCP corporators including district president.)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या उपस्थितीत या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. यासोबतच एमआयएमचे जिल्हाध्यक्षांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही महिन्यात उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरमध्ये राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे.

लातूर जिल्ह्यात एमआयएमला पाठबळ देणारे शहर म्हणून उदगीर ओळखले जाते. येथील नगरपालिकेत (Municipality) सात नगरसेवक हे निवडून आले होते आणि त्यापैकी पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. आता आगामी निवडणुकीत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा फायदा होतो हे पहावं लागेल. सध्यस्थितीत उदगीर नगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे.

नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 44 इतकी आहे. यापैकी भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 14 एमआयएमचे 7 सदस्य होते. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी खेळी खेळून एमआयएमचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत.

यांनी केला प्रवेश- एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!