terrible accident भीषण अपघातात दोघे ठार.

केज दि.20 एप्रिल – भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास केज बीड रोडवरील सांगवी पाटीवर घडली. ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात होवून दोन तरुणांचा करुण अंत झाला आहे.
( Two killed in a terrible accident.)
अंबाजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कुल च्या सहलीची ट्रॅव्हल्स केज बीड (Kaij Beed) रोडवरील सांगवी पाटी जवळ आली असता दुचाकी आणि ट्रॅव्हल्स अपघात झाला. या अपघातात (Accident) दोघेजण जागीच ठार झाले आहेत. हे दोघे केज (Kaij) तालुक्यातील वडमाऊली दहीफळ येथील जत्रेतुन दर्शन घेऊन निघाल्याचे कळते. विजय संभाजी आव्हाड (वय 30) व विकास हरिभाऊ पवार (वय 29) रा. कळंब असे मयत तरुणाची नावे आहेत. सारणी सांगवीजवळचा या रस्त्याचा भाग अपघातप्रवण क्षेत्र ठरत असून बांधकाम खात्याने येथे गतीरोधक व दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे.