आता बोला…. केजमध्ये मास्क लावा म्हणताच वाहकाची धूलाई तर कड्यात आदेश डावलून भरवला बाजार.

केज/कडा दि.7 मार्च – केज बस स्थानकातून माजलगाव सोलापूर बस मध्ये बसलेल्या प्रवाशास वाहकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावां असे म्हणताच प्रवाशाने वाहकाशी हुज्जत घालून शिवीगाळ करत वाहकाला बसमध्ये खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली तर आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून सर्रास आठवडी बाजार भरवण्यात आले आहे.
(Speak now …. Put the mask in the Kaij, wash the carrier and fill the market with orders.)
माजलगाव आगाराची बस माजलगाव – सोलापूर ही बस (एम. एच. 20 बीएल 2153) बस चालक (Bus driver) अंकुश रामभाऊ चव्हाण व वाहक नारायण बाळू पवार (वय 46, रा. समता कॉलनी माजलगाव ) हे दोघे शनिवारी सकाळी 8.45 वाजता माजलगावहुन सोलापूरकडे निघाले होते ही बस केज बस स्थानकात सकाळी 10.40 वाजेच्या सुमारास आली असता केज बसस्थानकातून सुरज विठ्ठल गुरव (रा. विठ्ठल नगर, केज ) या तरुण बस मध्ये प्रवास करण्यासाठी बसला होता सदर बस ही कळंब रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोर जवळ आली असता सुरज विठ्ठल गुरवयाने वाहकास कळंबचे तिकीट घेऊन चिंचोली फाट्यावर सोडण्यास सांगितले असता त्यास वाहक नारायण पवार यांनी तोंडाला मास्क लावण्यास सांगताच सूरज गुरव याने वाहकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाहकाने शिव्या का देता असे म्हणताच सूरज याने वाहक पवार यांच्या तोंडावर, हातावर चापटाबुक्याने मारहाण करीत त्यांना बसमध्ये खाली पाडून पायावर लाथा मारत मुकामार दिला. यावेळी बसमधील प्रवासी लक्ष्मण ढाकणे (रा. सारुळ ता. केज), चितांबर राऊत (रा. पिंपरी शिराढोण ता. केज ) व बस चालक (Bus driver) अंकुश चव्हाण यांनी सोडवासोडव करीत बस केजच्या पोलीस ठाण्यात आणली. वाहक नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रवासी सूरज गुरव याच्याविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी केज पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार दादासाहेब सिद्धे करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलत डोंगरगण येथे भरला आठवडी बाजार
कडा– कोरोनाचे संकटाने पुन्हा उसळी घेतली असून दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत चालल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी दि.31 मार्च पर्यंत आठवडी बाजार बंदीचा आदेश काढला. मात्र सदरील आदेशाच्या अमंलबजावणीत स्थानिक प्रशासन दुर्लक्ष कलात असल्याचे दिसुन येत आहे. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे आज आदेशाला फास घालत आठवडी बाजार भरल्याचे दिसुन आले. विशेष म्हणजे या बाजारात ना मास्क ना सोशल डिस्टंट बघावयास मिळाले.
एकीकडे राज्यात कोरोना (corona) संकट भयंकर रुप धारण करत असल्याने केंद्र व राज्य सरकार कठोर नियम लादण्याच्या व प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन व लोकांच्या असहकारामुळे कोरोना (corona) सारख्या रोगाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. वर्षभरात कोरोना संकटात पिळून निघालेल्या लोकांनी सर्रास नियमभंग करण्याचा विडा उचलल्याचे दिसून येत आहे.