क्राईम डायरी… अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; आईचाही केला विनयभंग.

गेवराई दि.31 जुलै – एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून (kidnapped) नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. यानंतर तीचा गर्भपात करत तिच्या आईवरही दोन वेळा बळजबरीने विनयभंग (molested) केल्याची संतापजनक घटना गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथे घडली असून या प्रकरणी तलवाडा पोलिस (Police) ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

(Crime Diary … kidnapped a minor girl; The mother was also molested.)

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाण्यांतर्गत (Police station) ठाकर आडगाव येत असून तेथे ऊसतोड मजुरी करणारी अत्याचारीत 35 वर्षीय महिला हि दोन मुले व एका 16 वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. दरम्यान घराशेजारी शेजारीच राहणारा अशोक सोनवणे याने एक वर्षापूर्वी पिडीतेच्या 16 वर्षीय मुलीला फुस लावून तसेच लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. तसेच तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केला.

यानंतर गावी परत येऊन आमचे लग्न लावून द्या म्हणून, आरोपी अशोक सोनवणे हा सातत्याने जिवे मारण्याची धमकी देत होता. तसेच अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केला. यानंतर देखील आरोपीने सदरील पिडीत मुलीच्या आईचा दोन वेळा बळजबरीने विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले असून आरोपी अशोक सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार (Child sexual abuse) तसेच विनयभंग प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस (Police) करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!