घात अपघात

Murder क्षुल्लक कारणाने धारुरच्या तरूणाचा पुण्यात खुन.

56 / 100

किल्लेधारुर दि.26 ऑगस्ट – Murder पुण्यात डिलिव्हरी बाॅय म्हणुन काम करणाऱ्या दोन सहकारी मित्र असलेल्या तरूणांत रेनकोटच्या कारणावरून वाद झाला. वाद मिटवण्यास आमनेसामने आलेल्या या दोन्ही मित्रांत पुन्हा वाद होवून एकाने दुसर्‍या मित्रावर चाकुने वार करून त्याचा खुन केल्याची घटना पुण्यात घडली. दरम्यान या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असुन पोलीसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केल्याचे समजते. मृत्यु झालेला तरूण हा धारुर तालुक्यातील कारी येथील असुन त्याच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, तेलगाव पासुन जवळच असलेल्या कारी ता.धारूर येथील रहिवाशी असलेले व तेलगाव येथे व्यावसायिक असलेले श्रीभाऊ वाघमारे यांचा मुलगा आदित्य वाघमारे हा गेल्या कांहो महिन्यांपासुन नोकरी निमित्त पुण्यात वास्तव्यास आहे. आदित्य आपल्या इतर मित्रांसह रूम किरायाने करून एकत्र राहत होता. त्याच्या सोबत बीड जिल्ह्य़ातीलच सुरेश भिल्लारे हा तरूण ही पिझ्झा डिलिव्हरी करत होता. हे दोघे दिवसा पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करायचे आणि सायंकाळी शाॅपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बाॅय म्हणुन काम करत होते. गेल्या महिनाभरापासुन दोघांची ओळख झाली होती. दि.25 ऑगस्ट रोजी आदित्य व सुरेश या दोघांत रेनकोटच्या कारणावरून वाद झाला होता. दोघांतील हा वाद मिटविण्यासाठी त्या दोघांनी नरे भागात रात्री भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे रात्री दोघे एकत्र आले. दोघामध्ये वादावर चर्चा झाली. मात्र वाद मिटण्याऐवजी वाढतच जाऊन दोघांत भांडण झाले. या भांडणात सुरेश भिल्लारे त्याच्याकडील असलेला चाकु आदित्य वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे गंभीर जखमी झाला आणि त्याला दवाखान्यात उपाचारास नेण्या पुर्वीच त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असुन पोलीसांनी आरोपी सुरेश भिल्लारे यास अटक केली आहे. आदित्य याचा त्याच्या जवळच्याच मित्राने अशा निर्घृणपणे खुन केल्याने पुण्यात खळबळ उडाली. तर आदित्य याच्या कारी गावात त्याच्या निधनाने शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!