क्राईम न्यूज… धारुर तालुक्यात विनयभंग व मारहाण; बसमध्ये चढताना महिलेचे गंठण लंपास.

किल्लेधारूर दि.14 जुलै – मंगळवारी बसस्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील गंठणाची चोरी झाल्याची घटना घडली तर तालुक्यातील देवदहीफळ येथील शिवारात एका महिलेचा विनयभंग (molestation) करत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Crime News … molestation and assault in Dharur taluka; The woman’s knot lampas while getting on the bus.)

बसमध्ये चढताना गंठण चोरी.
अंबाजोगाई शहरातील क्रांती नगर येथे राहणाऱ्या तारामती अर्चित खोपे वय (51) अंबाजोगाई येथे जाण्यासाठी किल्ले धारूर बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बस मध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील 26 हजार दोनशे रुपये किमतीच्या अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध किल्ले धारूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार कातकडे हे करीत आहेत.

महिलेचा विनयभंग व मारहाण.
शरीरसुखाच्या मागणीला विरोध केल्याने एका महिलेस तिच्या मदतीला धावून आलेल्या कुटुंबातील अन्य दोन महिलांसह अपंग शेतकरी व लहान मुलगा अशा पाच जणांना कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यातील देवदहिफळ शिवारात रविवारी 11 जुलै रोजी दुपारी 12 वाजता घडली. पाचही जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी सहा जणांवर दिंद्रुड पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंद्रुड येथील रंगनाथ हरिभाऊ साखरे (वय 75) यांची धारूर (Dharur) तालुक्यातील देवदहिफळ शिवारात गट क्रमांक (52) मध्ये शेती असून रविवारी नेहमीप्रमाणे कुटुंबिय मजुर महिलांबरोबर शेतात खुरपणी, मशागती करत असतांना त्या ठिकाणी शेत जमिनी शेजारी असलेले सुनिल बडे व दिलीप बडे यांनी येवून तक्रारदार महिला गिता उर्फ पंचपुला साखरे हिच्या जावेकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.

महिलेने आरडाओरड केली तेंव्हा तिचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेले वृध्द सासरे रंगनाथ साखरे व सासू शांताबाई साखरे यांनाही आरोपीने हातातील कोयता, कुऱ्हाडीने महिलेच्या गिता साखरे हिच्या पाठीवर अपंग शेतकरी रंगनाथ साखरे यांच्या हातावर वार केले. त्याच बरोबर तक्रारदार महिलेच्या गळ्यातीच सोन्याची पोत पडली असून या प्रकरणी प्रकरणात तक्रारदार महिला तिचा लहान मुलगा, जाऊ, वृध्द सासू, अपंग सासरे यांना आरोपींनी शेतातील जीवे मारण्याची धमक्या दिल्याची तक्रार महिलेने दिंद्रुड पोलिस ठाण्यात (Police station) दिली आहे.

या प्रकरणी गिता साखरे यांच्या तक्रारीवरून सुनील सुदाम बडे, दिलीप सुदाम बडे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषेराव बडे व बंडू बडे (रा.देवदहिफळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अपंग व्यक्तीस गंभीर मारहाण केल्याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!