धारुर पंचायत समितीचे पहिले सभापती मोहन मुंडे यांचे निधन .

54 / 100

किल्लेधारूर दि.13 जुलै – धारुर पंचायत समितीचे पहिले सभापती मोहन मुंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने (दि.12) मंगळवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 67 वर्षांचे होते. 1992 मध्ये धारुर तालुका निर्मितीनंतर झालेल्या जि.प. पं.स निवडणूकीत पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा सन्मान त्यांना मिळाला होता.

वडवणी तालुक्यातील कोठारबनचे रहिवाशी व डोंगरपट्यातील राजकारणाचे भिष्माचार्य अशी ओळख निर्माण करत धारुर व वडवणी तालुक्यात राजकिय अस्तित्व प्रस्थापित करणारे माजी सभापती मोहन आनंदराव मुंडे याचं ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने काल मंगळवार (दि 12) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मोहन आनंदराव मुंडे यांना वडवणी तालुक्यात तात्या या नावाने ओळखले जात होते. मुंडे यांनी धारुर पंचायत समितीचे पहिले सभापतीसह वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, वडवणी जि.प.गटामधून पत्नीला निवडून आणले आणि बीड जि.प.चे समाजकल्याण सभापती, तेलगांव कारखान्याचे संचालक अशी पदे भूषविले आहेत.

1992 च्या काळात स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. यानंतर आ.प्रकाश सोंळके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे खंबीर विश्वासू म्हणून देखील त्यांची ओळख होती. त्यांना मंगळवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बीड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना औंरगाबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने त्यांचा अॉक्सिजन खाली येत असताना ह्दयविकाराचा तिव्र झटका आला. यातच सकाळी साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन मुल, दोन मुली सह भाऊ, भाऊजया, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे डोंगरपट्टा पोरका झाला आहे. मोहन मुंडे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मोठ्या जड अंतकरणाने अंतसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
( Mohan Munde, the first chairman of Dharur Panchayat Samiti, passed away. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!