निवडणूक कामात दांडी मारणाऱ्या चार शिक्षकांवर गुन्हे नोंद…. धारुर मधील प्रकार

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूकीत नियुक्ती देवूनही विविध प्रशिक्षणाला गैरहजर राहुन निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्या व निवडणूक (Election) विभागाचा अवमान करणाऱ्या धारुर तालुक्यातील चार शिक्षकांवर पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील घटनेमुळे शिक्षण (Education) विभागात खळबळ उडाली आहे. सदरील कारवाईमुळे निवडणूक अथवा तत्सम कामात हयगय करणाऱ्यावर वचक बसणार आहे.

याबाबत वृत्त असे की, आज दि.१५ शुक्रवार रोजी  धारुर तालुक्यातील पाच ग्रामपंचायत (Gram Panchayat) च्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येथील तहसीलदार धारुर यांनी निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या. यात शिक्षण (Education) विभागातील शिक्षकांचाही समावेश होता. नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पैकी चार कर्मचारी निवडणूक विभागाच्या विविध प्रशिक्षणाला सतत गैरहजर होते. गुरुवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला पथक रवाना होत असतानाही सदरील शिक्षक गैरहजर असल्याने निवडणूक (Election) कामात अतिरिक्त ताण येवून संबंधित चार कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाचा अवमान केला. या प्रकरणी तहसीलदार वंदना शिडोळकर, निवडणूक विभाग प्रमुख रामेश्वर स्वामी यांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे यांना तात्काळ कारवाईचे आदेश काढले. या आदेशावरुन गटशिक्षणाधिकारी चोपडे यांनी शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख एस.एस. सुरवसे यांना प्राधिकृत करुन गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले. धारुर पोलिसात (Police) या प्रकरणी एस.एस. सुरवसे यांच्या फिर्यादी वरुन संबंधित चार शिक्षक अर्जून मुंडे, कैलास चाटे, आशोक मुंडे, मधूकर आदमाने यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आली आहेत. प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाल्याने शिक्षण विभागासह निवडणूक कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!