धारुरमध्ये मध्यरात्री धाडसी चोरी; पाच लाख रुपयांचे कापड गठाण अज्ञात चोरट्यांनी लांबवले.

किल्लेधारूर दि.6 सप्टेंबर – धारुर (Dharur) शहरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी (thieves) कादरी बाग भागात घरासमोर लावलेल्या सुमो गाडीतील तब्बल पाच ते साडेपाच लाख रुपये किमतीचे कापड गठाण पळवल्याची घटना घडली आहे.

(Daring robbery at midnight in Dharur; Five lakh rupees worth of cloth was stolen by unknown thieves.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोमीन अफरोज मुस्तफा यांचे शहरातील कादरी भागात कापड दुकान आहे. शिवाय दररोज वेगवेगळ्या गावातील बाजार करुन ते आपला उदरनिर्वाह चालवतात. काल दि.5 रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जागीरमोहा येथून परतल्यानंतर अंदाजे पाच ते साडेपाच लाखाचा माल असलेली गाडी दुकानासमोर पार्किंग (Parking) केली.

रात्री अकरानंतर अंदाजे रक्कम 5 ते साडेपाच लाख रुपयांचा माल गाडी क्र. एम. एच.24 सी 6574 मधून अज्ञात चोरट्यांनी पळवला. यात रेडिमेड ड्रेस, साड्यासह सुटे कापडाचा समावेश होता. याबाबत धारुर पोलिसांत (Police) गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!