आष्टीत आढळला मृतावस्थेत बिबट्या; वनविभाग घटनास्थळी दाखल.

आष्टी दि.18 जून – आष्टी (Ashti) तालुक्यातील मातावळी परिसरात गायरानातील झाडीत शुक्रवार दि.18 रोजी गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांला वयोवृद्ध मृत बिबट्या (Leopard) कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
(Dead leopard found rotting in Ashti; Forest Department rushed to the spot.)
शेतकऱ्यांला मृत कुजलेल्या अवस्थेत असलेल्या बिबट्याचे मुंडके (शिर), जबडा, हाडे आणि कातडी दिसुन आली. याची माहिती आष्टी वनविभागाला (Forest department) दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता तो बिबट महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केला आहे.
आष्टी (Ashti) तालुक्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने बिबट्याची संख्या जास्त आहे असे बोलले जात आहे. त्यात बीडसांगवी येथील महादेव दऱ्यातील मंदिराच्या कॅमेऱ्यात काही दिवसांपूर्वी बिबट्या (Leopard) दिसला होता. यांची माहिती ह.भ.प.कल्याण महाराज कोल्हे यांनी दिली होती. मागील घटनेमुळे बिबट्याची दहशत संपुर्ण तालुक्यात आहे.
मात्र, हे बिबटे माणसावर हल्ला करत नाहीत. मात्र बिबट्याचा वावर आहे. असे वनविभागाकडून बोलले जात आहे. त्यात हा प्रकार आष्टी-पाटोदा सीमेवर असलेल्या मातावळी डोंगरात समोर आला आहे. अजूनही एका बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे असे वनविभागाकडून बोलले जात आहे.
घटनास्थळी वनविभागाने (Forest department) धाव घेतली असून वरिष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर व टीमला पाचारण केले आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला असेल ते शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालात समोर येईल अशी माहिती आष्टी तालुका वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी दिली आहे.