अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तहसीलदारांसह दोघे गंभीर जखमी.

बीड दि.6 मार्च – मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळील रस्त्याच्या खड्यात गाडी जावून झालेल्या अपघातात (Accident) एक कर्मचारी ठार तर तहसीलदार जखमी झाल्याची घटना घडली.

( Death of a board officer in an accident; Two seriously injured including tehsildar. )

या अपघातात बीडचे मंडळ अधिकारी ठार तर तहसीलदारांसह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. नितीन जाधव (वय 39) राहणार बीड मंडळ अधिकारी असे अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नावं आहे. ते व बीडचे (Beed) तहसीलदार सुरेद्र डोके व अन्य एक कर्मचारी हे तालुक्यातील वाळु पट्यात बीडच्या पथकासोबत रविवार रोजी पहाटे दोनच्या सुमारास गेवराईकडे (Gevrai) परत येत होते.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जावुन गाडी झाडावर पडल्याने या झालेल्या अपघात नितीन जाधव हे जागीच ठार झाले तर बीडचे तहसीलदार (Tehsildar) सुरेंद्र डोके हे जखमी झाले असुन त्यांना पुणे येथील रूग्णालयात नेण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. यासाठी पथक निर्माण करुन रात्री अपरात्री होणाऱ्या वाळु तस्करावर कारवाई करण्यात येत आहे. सतत वाळु वाहतूकीमुळे होणाऱ्या अपघातामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून कारवाईची मागणी वाढली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!