विहिरीत पडून नवविवाहितेचा मृत्यू ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.8 अॉगस्ट – विहिरीत पडून नवविवाहितेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धारुर (Dharur) तालुक्यातील सुकळी येथे रविवारी घडली. तीन महिन्यापुर्वीच लग्न झालेल्या विवाहितेच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
( Death of a newly wed after falling into a well; Incidents in Dharur Taluka.)
राणी गणेश राऊत (वय 21) असे मयत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (दि.7) गावातील पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी राणी राऊत ही विवाहिता गेली होती. यावेळी पाय घसरुन विहिरीत पडल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवविवाहितेचे तीन महिन्यापुर्वीच गणेश राऊत या सुकळी ता.धारुर या तरुणाशी विवाह झाला होता. त्यांचे माहेर माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील उमरी आहे.
विवाहिता विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिर खोल असल्याने विवाहितेचा शोध लागला नाही. पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत मृतदेह (dead body) शोधन्यासाठी अग्निशमन दलाला (fire brigade) पाचारण करावे लागले. अग्निशमन दलाच्या सुनिल आदाडे व त्यांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांतून प्रेत बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेमुळे सुकळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.