माझं गाव

निधन वार्ता… जगन्नाथ तांबवे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन… हृदयविकाराची सलग तिसरी घटना.

किल्ले धारूर दि.18 मे – येथील प्रतिष्ठित व्यापारी जगन्नाथअप्पा काशिनाथ तांबवे यांचे आज (दि.18) बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकाळी छतावर पायी फिरत असताना ही घटना घडली.

शहरातील जोडआड गल्लीतील रहिवासी व गणेश लॉजचे मालक जगन्नाथअप्पा काशिनाथ तांबवे (वय 65) आज सकाळी घराच्या छतावर सकाळी पायी फिरत असताना छातीत अचानक दुःखू लागले. यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा ओरिसा तर एक पुण्यात नोकरीसाठी स्थलांतरीत असल्याचे कळते. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळीपर्यंत विरशैव पंथाच्या पारंपारिक पध्दतीने दफनविधी करण्यात येतील. ते वसंतअप्पा तांबवे यांचे धाकटे बंधू होत.

हृदयविकाराच्या धक्क्याची तिसरी घटना…
शहरात हृदयविकाराच्या धक्का येण्याची ही तिसरी घटना आहे. दि.16 सोमवारी सकाळी येथील आसरडोह रोडवरील शिक्षक कॉलनीत राहणारे कॕप्टन वशिष्ठ साखरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तर काल दि.17 मंगळवारी बाराभाई गल्लीतील देवराव माने यांचे सकाळी तर आज दि.18 बुधवारी जगन्नाथ तांबवे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

( Death story … Jagannathappa Tambwe dies of heart attack … Third incident of heart attack in a row. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!