बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; एका विरुध्द गुन्हा दाखल

बार्शी दि.6 मार्च – बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांना जीवे ठार मारण्याची धमकी त्यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांच्याकडे कळवण्यात आली आहे. यामुळे खळबळ माजली असून पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Death threat to Barshi MLA Rajendra Raut; Filed a crime against one)

शिवसेना नेते आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही अशी धमकी आ. राऊत यांना देण्यात आली आहे. पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी (Barshi) शहर पोलीस ठाण्यात भांदवि ५०७ कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) हे अपक्ष आमदार आहेत. आमदार राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्यातील वैर याभागात सर्वश्रुत आहे.

आ.राऊत व आंधळकर या दोघांचे कार्यकर्ते गेल्यावर्षी हाणामारीवर उतरले होते. मागील अनेक निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं. भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर सोलापूर आणि विशेषत: बार्शीतील (Barshi) राजकीय राडेबाजी आणखी वाढल्याचं चित्र आहे. यातूनच हा धमकीचा प्रकार आता समोर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!