Pistol seized धारुर पोलिसांनी केले पिस्टल जप्त ; आरोपींना चार दिवसांची कोठडी.

किल्लेधारुर दि.१२(वार्ताहर) Pistol seized धारुर पोलिस हद्दीतील आडस ता.केज येथे दोन गटात झालेल्या भांडणानंतर पोलिस तपासात आरोपीकडून चाकूसह पिस्टल जप्त करण्यात आले. या घटनेनंतर खळबळ माजली असून सध्या सुरु असलेल्या वादंगानंतर पुन्हा चर्चेस उधाण आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार दिनांक ११ सायंकाळी ७ वाण्याच्या सुमारास मौजे आडस येथे दोन गटात वाद चालु आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस ठाणे धारुर येथील पोलीस अधिकरी अंमलदार हे सदर ठिकाणी जावुन दोन गटातील वाद शांत करण्यात आला. व दोन्ही गटाना पोलीस ठाणे धारुर येथे बोलावुन त्यांना भांडणामध्ये मार लागल्याने वैद्यकिय तपासणी करुन घटनातील जखमी फिर्यादी नामे आकाश विश्वनाथ आकुसकर (वय २९ वर्षे) व्यवसाय हॉटेल व शेती रा. आडस ता. केज.जि.बीड याचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे धारुर गुरन १५/२०२५ कलम १०९,१०८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) भा.न्या.सं.२०२३ सह कलम ३/२५,४/२५ आर्म ऑक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी नामे १) गौरव मलिकार्जुन आकुसकर २) संघर्ष शिवदास आकुसकर ३) सोन्या शिवशंकर आकुसकर ४) सुरज भारत पतरवाळे सर्व रा.आडस ता. केज जि.बीड यांना तात्काळ अटक करण्यात आली. तांत्रिक तपास करुन मोबाईल मधील व्हिडोओ क्लीपचा धागा पकडुन सदर गुन्हयातील आरोपी नामे गौरव मलिकार्जुन आकुसकर रा. आडस यांचे कडे असलेले चाकु व पिस्टल जप्त करण्यात आला. विरोधी गटाचे फिर्यादी नामे संघर्ष शिवदास आकुसकर (वय २४ वर्षे) रा.आडस ता. केज यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे धारुर गुरन १६/२०२५ कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३),३(५) भा.न्या.सं. २०२३ प्रमाणे परस्पर विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहते.
सदर ठिकाणी माहिती मिळताच पोलीस सतर्कतेने पोहचल्याने पुढील अनुचित घटना टळली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक कतलेश मीना , उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. धारुर प्रभारी अधिकारी सपोनि देविदास वाघमोडे, पोउपनि एस.आर.सजें, स.फौ. ए.आर.पांडे, पो.हे.कॉ पुरी, पो.ना. आर.सी. दुधाने, पो.कॉ. विशाल मुजमुले.पो.कॉ. गायसमुद्रे, पो.कॉ. शेख हे करीत आहेत. आरोपीतांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.१५ पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. पुढील तपास सुरु आहे.