BEED24

धारूर घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळले प्रेत; फाशी घेतल्याचा संशय.

किल्लेधारूर दि.19 अॉक्टोंबर – धारूर घाटात कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धारूर तेलगाव रस्त्यावर घाटातील दरीत एका लिंबाच्या झाडाला अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन फाशी घेतल्याचे उघड झाले असून संबंधित व्यक्तीचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत धडा वेगळे झाल्याचे पोलिसांना दिसून आले. या प्रेताजवळ एक मोबाईल आढळून आला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

धारूर तेलगाव रस्त्यावर धारूर घाटामध्ये (Dharur Ghat) पहिल्याच वळणानजीक दरीमध्ये लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार सहा ते सात दिवसा पूर्वी घडल्याचा संशय या प्रेताचे अवस्थेवरून दिसून येत आहे. हे प्रेत कुजून धड वेगळे व मुंडके वेगळे झाले असून पोलिसांना (Police) धड घटनास्थळी आढळून आले आहे. मुंडके ही या पासून जवळच आढळून आले. या प्रेताजवळच मोबाईल सापडला असून प्रेत सडलेल्या अवस्थेत आहे. या प्रेताची अद्याप ओळख पटलेली नाही. या बाबत पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती धारूर (Dharur) पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक (API) विजय अटोळे यांनी दिली.

( Decomposing body found in Dharur Ghat; Suspect hanged. )

Exit mobile version