दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली… मुंबईत हाय अलर्ट

मुंबईः दि.२९ – राजधानी दिल्लीतला (Delhi) व्हीव्हीआयपी आणि सर्वात सुरक्षित मानला जाणाऱ्या ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी एका बाँब स्फोटाने हादरला. हा एलईडी (LED) स्फोट इस्रायल दूतावासाजवळ झाला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई (Mumbai) हाय अलर्ट (high alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Police) बंदोबस्तात वाढ केली आहे. विमानतळ आणि सरकारी इमारतींचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इस्रायल एम्बसीजवळ स्फोट झाल्याने मुंबईतही ज्यूंची वर्दळ असणाऱ्या नरिमन हाउसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दिल्लीतला (Delhi) सगळ्यात हाय प्रोफाइल भागाजवळ इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला. स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकापासून फक्त दीड किलोमीटरवर आहे. याच विजय चौकात बीटिंग रीट्रीट (Beating the retreat) कार्यक्रम सुरू होता. फक्त या कार्यक्रमामुळे स्फोटाच्या हानीचं प्रमाण कमी झालं. दरवर्षीप्रमाणे २६ जानेवारीनंतर राष्ट्रपती भवनाजवळ हा बीटिंग रीट्रिटचा (Beating the retreat) कार्यक्रम होतो. त्यासाठी विजय चौकापासूनच मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त असतो. तसंच या परिसरातले रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले जातात. दिल्ली स्फोटात तीन गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत. यामध्ये जीवित हानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. फुटपाथजवळ एलईडी (LED) लपवून ठेवलं होतं. दिल्ली पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार हा ब्लास्ट कमी तीव्रतेचा होता. गोंधळ पसरवण्यासाठी हा ब्लास्ट करण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत आहे. या घटनेनंतर देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई (Mumbai) हाय अलर्ट (high alert) जारी करण्यात आला आहे.