बीडमध्ये भाजप आमदार पतीला अर्वाच्य भाषेत शिविगाळ; अॉडियो क्लिप व्हायरल.

बीड दि.3 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्ह्यातील केज विधानसभेच्या भाजपच्या महिला आमदारांच्या (BJP MLA) पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली असून यामुळे एक खळबळ उडाली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांनी आपल्या अॉनलाईन आवृत्तीतून या वृत्तास प्रसिध्दी दिली आहे.

(BJP MLA’s husband abused in Beed; Audio clip goes viral.)

रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. बीड जिल्ह्यातील केज (Kaij) विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा हा प्रकार आहे. मात्र याची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यामुळे सदरील प्रकार समोर आला  आहे.

या प्रकारा बाबत अक्षय मुंदडा (Akshay Mundada) यांनी माध्यमांना सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे रा. अंबाजोगाई (Ambajogai) यांचा फोन आला. त्यांनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले.

विनंती न ऐकल्यामुळे राग अनावर
एका देवस्थानच्या रस्ता कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. आधी ऋषिकेश लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. मात्र विनंती करूनही आमदार पतीने न ऐकल्यामुळे ऋषिकेश लोमटे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. या ऑडिओ क्लिप वरून मात्र चर्चेला उधान आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!