उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आयकर विभागाची कारवाई.

मुंबई दि. 2 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची 1000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची मोठी कारवाई आयकर विभागाने केली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट (Nariman Point) येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

(Deputy Chief Minister Ajit Pawar’s assets worth Rs 1000 crore seized; Action of Income Tax Department.)

यापूर्वी, आयकर विभागाला (Income Tax Department) मुंबईतील काही रिअल इस्टेट व्यावसायिक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या ताब्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती.

केंद्रीय संचालक कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये सुमारे 70 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान बेनामी व्यवहारही आढळून आले असून, त्याबद्दल काही पुरावे हाती लागले आहेत.

छाप्यात सापडलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरून दोन्ही ग्रुपकडे सुमारे 184 कोटी रुपये सापडले आहेत, ज्याचा कोणताही हिशेब उपलब्ध नाही. मात्र, या दोन्ही ग्रुपपैकी एकाही गटाचे नाव या विभागाने दिलेले नाही. छाप्याच्या दिवशी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आयकर विभागाने त्यांच्या तीन बहिणींच्या जागेवरही छापे टाकले आहेत. त्यापैकी एक कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात राहतात.

या मालमत्तेवर कारवाई
1. जरंडेश्वर शुगर फॅक्टरी- किंमत- सुमारे 600 कोटी
2. साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट- किंमत- सुमारे 20 कोटी
3. पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस- किंमत सुमारे 25 कोटी
4. निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट- किंमत- सुमारे 250 कोटी
5. महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन- किंमत सुमारे 500 कोटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!