धनंजय मुंडे हाजीर हो…. मुंडे धारुर न्यायालयात; सामान्य कार्यकर्त्याच्या घरी दिली भेट.

किल्लेधारूर दि.25 जानेवारी – येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात आज एका प्रकरणात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे (Beed) पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) न्यायालयासमोर स्वतःहून आरोपी म्हणून हजर होते. यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी शहरातील सामान्य कार्यकर्ता प्रदिप नेहरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
(Dhananjay Munde is present …. Munde Dharur in court; A visit to the home of a common worker.)
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रकरणात स्वतः निर्णय व न्याय देण्याचा अधिकार असलेला असामान्य व्यक्ती आज सामान्य आरोपीच्या रुपात न्यायालयाचा सम्मान राखत असतानाचा अनुभव आला. यासोबतच एका सच्चा कार्यकर्त्याचा मान राखून त्याच्या निवासस्थानी भेट देवून बळ दिल्याचा अनुभव कार्यकर्त्यांनी घेतला.
न्याय व्यवस्था हि अतिसामान्य ते असामान्य व्यक्तीसांठी सारखीच असते. न्यायालयात दाद मागण्याचा सर्वांचा अधिकार सारखाच. प्रकरण राजकीय असो की अराजकीय सर्व आरोपी न्यायालयाचा आदर राखत न्यायाची अपेक्षा करतात. आज मंगळवारी (दि.25) न्यायालयात राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री तथा बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे एका राजकीय प्रकरणातील आरोपी म्हणून उपस्थित होते.
दिंद्रुड पोलिस (Police) ठाणे अंतर्गत तेलगाव येथे झालेल्या एका विजयी मिरवणूकीतील वादानंतर तत्कालीन पोलिस निरिक्षक दिपक पवार यांनी फिर्याद देवून 24 आरोपी विरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सन 2006 मध्ये नोंदवला होता. 2009 पासून आरोप निश्चिती नंतर सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या खासदार, आमदार यांच्या वरील खटले तात्काळ निकाली काढण्याच्या निर्देश देण्यात आलेले आहेत. एका जुन्या प्रकरणात आरोपी असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज स्वतःहून न्यायालयात हजर झाले. मंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा धनंजय मुंडे न्यायालयात उपस्थित झाले होते.
न्यायप्रविष्ठ प्रकरणास गती येवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने या खटल्याचे काम विधिज्ञ ॲड.जे.बी. बडे पाहत आहेत. यावेळी न्यायालय परिसरात धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रा.इश्वर मुंडे, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, परमेश्वर तिडके, गौतम चव्हाण, बाबासाहेब बडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.