पंकजा मुंडेच्या भुमिकेनंतर धनंजय मुंडे यांचा पलटवार … आज 8 जागेसाठी मतदान.

बीड दि.20 मार्च – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी डिसीसी बँकेच्या (Beed District Bank election) निवडणुकीतून माघार घेत धनंजय मुंडे यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावत एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

(Dhananjay Munde’s counterattack after the role of Pankaja Munde … Voting for 8 seats today.)

आज डिसीसी बँकेच्या (Beed District Bank election) निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काल मतदानाच्या पुर्वसंध्येला बीड येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे जाहिर केले. यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षाने मतदानाच्या काही तासा अगोदर माघार घेतली आहे. मतदारांवरच माजी मंत्र्यांचा विश्वास राहिला नाही. कोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नसल्याचे सांगत लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या 6 जागा लढवत अहे. सर्वची सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी होणार असल्याचा विश्वास धनंजय मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी व्यक्त केला. कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन मुंडे यांनी केलं.

दरम्यान, आज दि.20 मार्च शनिवारी डिसीसी बँकेच्या आठ जागांसाठी सकाळी 8 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यात यासाठी अकरा ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यात बीड येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालय, आष्टी, पाटोदा, माजलगाव व धारुर येथील सहाय्यक निबंधक कार्यालय, गेवराई येथे जि.प. कन्या शाळा, केज येथे शिक्षक पतसंस्था, अंबाजोगाई येथे ग्रामीण विकास मंडळ प्रशासन, परळी येथे वैद्यनाथ सह.औद्योगिक वसाहत तर वडवणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती या मतदान केंद्राचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!