धनगर ST आरक्षण याचिकेचा निकाल लवकरच – शेळके.

50 / 100

जळगाव दि.2 एप्रिल – धनगर ST आरक्षण ( ST reservation ) याचिकेचा निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती राज्यसचिव सुधाकर शेळके यांनी म.अ. समाज प्रबोधन मंच जळगाव शाखा आयोजित प्रबोधन मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना आज दि.2 एप्रिल रविवारी व्यक्त केली.
( Dhangar ST reservation petition result soon – Shelke. )

आज रविवार दि.2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे माजी महापौर जळगाव महानगर पालिका व विद्यमान नगरसेवक सदाशिवराव देवळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आत्माराम म्हाळके माजी पंचायत समिती सभापती, चोपडा, सुरेश धनके माजी शिक्षण समिती सभापती, जि. प जळगाव, साहेबराव पातोंड, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, जळगाव यांच्या विशेष उपस्थितीत म.अ. समाज प्रबोधन मंच जळगाव शाखेने प्रबोधन मेळावा आयोजित केला होता.

आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना म.अ.समाज प्रबोधन मंचचे राज्यसचिव सुधाकर शेळके सांगितले, की, “धनगड” या जमातीचा नव्हे तर शब्दाचा उगमच हा स्वातंत्रोत्तर काळात 1956 ला झालेला आहे. धनगड नावाची जमात तर अस्तित्वात नव्हती आणि नाही. पण धनगड हा शब्दही अस्तित्वात नव्हता. स्वातंत्रपूर्व काळात धनगड हा शब्द आणि जमात अस्तित्वात नव्हती. हे आम्ही सत्य आणि प्रमाणित पुराव्याआधारे शोधलेले आहे. वास्तविक, आरक्षण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या दशकापासून यासंदर्भात पुरावे जमा करुन मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल केलेली आहे. तसेच व्यासपीठावरून बोलताना म. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे कायदेशीर सल्लागार मुरारजी पाचपोळ यांनी सांगितले की, या याचिकेवर (petition) दि. 10 ते 13 एप्रिल दरम्यान सलग सुनावणी होणार असून लवकरच अंतिम निकाल आपल्या हाती आलेला असेल. मंचचे महासचिव डॉ.जे.पी. बघेल यांनी देशभरातील आरक्षण व्यवस्थेवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंचचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.शामकांत वर्डीकर, राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा सचिव भिकनराव पेंढारकर व शेकडो जमात बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!